दिव्यातील महिलेस सोशल मीडिया वरील ओळख पडली महाग.. आरोपीने नोकरी देतो सांगून केली शरीरसुखाची मागणी.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २७ जून : दिव्यातील म्हात्रे गेट परिसरात आपल्या बहिणीकडे रहावयास आलेल्या महिलेला मुंबईतील पवईतील इसम नामे अक्षय हिवराळे याच्याशी सोशल मीडियावर ( इंस्टाग्राम ) ओळख झाली होती. नोकरीच्या शोधात असलेल्या महिलेस कामानिमित्त पवई येथे गेल्यावर जीवघेणा प्रसंगाला सामोरे जावे लागले.
प्रसंगी अनिताचा (नाव बदली) पती कामानिमित्त गुजरात येथे राहत असून ती देखील पती सोबत राहवयास होती परंतु मागील एक महीन्यांपूर्वी त्यां दोघात काही कारणावरून वाद झाला होता परिणामी अनिता (बदलेले नाव) दिव्यातील बहिणीकडे राहण्यास आली व नोकरी करून आपण आपला स्वतः उदरनिर्वाह करण्यासाठी कुठे काम मिळेल या शोधात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून ( इंस्टाग्राम ) येथे आरोपी अक्षय हिरवाले याची ओळख झाली व दोघांनी एकमेकाचा मोबाईल नंबर हस्तातरीत केला व आरोपी अक्षयने मुंबईतील हिरानंदानी पवई येथे जॉब असल्याचे सांगून सदरचे काम पाहण्यासाठी त्याने अनिताला पवई तलाव येथे बोलाविले असता तेथे थोड्या गप्पा मारून आरोपीने शरीरसुखाची मांगणी केली आपण दोघे लग्न करून एकत्रच राहू असे म्हणू लागताच अनिताने विरोध करत त्याला झटकण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अक्षयाने आपल्या खिशातून धारधार चाकू काढत अनिताला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत शांत बस नाहीतर तूला कापून तलावातील मगरीला खायला देईन’ अशी धमकी दिली व सायंकाळ पर्यन्त पवई तलाव येथे त्याच ठिकाणी बसून ठवले त्यानंतर आरोपी अक्षय म्हणाला की आता मी घरी जातो, घरी गेल्यानंतर मला कॉल करायचा नाही, मी जेव्हा कॉल करेन तेव्हा मला भेटायला यायचं असे ठणकावून सांगत निघून गेला भयभीत झालेल्या अनिताने दिव्यातील बहिणीच्या घरी येत घाबरलेल्या अवस्थेत कोणालाही काही सांगितले नाही शेवटी बहिणीला झालेला प्रकार समजताच तिने आधार देत पवई पोलीस स्टेशन येथे आरोपी अक्षय विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे सदर पोलिसांनी देखील घटनेच गांभीर्य ओळखून आरोपी अक्षय विरोधात कठोर कारवाई करू असे आश्वासन दिल आहे.