ठाण्यातील रघुनाथनगर येथे इमारतीच्या दहाव्या माळ्यावर डुप्लेक्स फ्लॅटला भीषण आग.
संतोष पडवळ (ठाणे)
ठाणे ता १६ जून : दिनांक १५/०६/२०२५ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार मित्तल पार्क, रघुनाथ नगर, वागळे इस्टेट, ठाणे (प.) या ठिकाणी प्रकृती पार्क (तळ + १० मजली इमारत + डुप्लेक्स रूम) या इमारतीच्या १० व्या मजल्यावरील रूम क्रमांक:- १००२ + डुप्लेक्स रूम (मालक:- श्री. रमेश मोहिलेदेवा) या रूममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. तडवी सो., माजी लोकप्रतिनिधी श्री. विकास रेपाळे सो., श्रीमती मिनल संख्ये मॅडम, श्रीमती नम्रता भोसले मॅडम व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१ – पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी श्री. शेळके सो व श्री. कदम सो. व जवान ०२-फायर वाहन व ०१- रेस्क्यु वाहनासह आणि महावितरण कर्मचारी, महानगर गॅस कर्मचारी उपस्थित होते.
तसेच, आग लागल्याने घरातील फर्निचर इलेक्ट्रिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य व वायरिंग जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. श्री. ओझस रमेश मोहिलेदेवा (पु / २४ वर्षे) व पाळीव कुत्रा हे रूममध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आले असून श्री. ओझस मोहिलेदेवा यांच्या पाठीला किरकोळ भाजले असून उपचाराकरिता ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.
सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून २२:४० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.




