ब्रेकिंगराजकिय

दिवा भाजप आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न. ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थित अनेकांचा भाजप प्रवेश.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २२ जून : दिवा भाजप आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा दिवा शहरातील वारेकर शाळेतील हॉल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रसंगी भाजपमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश झाला. भाजपा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष संदीप लेले, माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, भाजपा कल्याण शहर (जिल्हा) नंदू परब आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थित अनेकांनी भाजप मध्ये प्रवेश केला तर आयोजक विजय भोईर यांनी दिव्यातील अनेक समस्याची पोलखोल केली. तर मान्यवरांनी सर्वाना मार्गदर्शन केले.

सदर संवाद मेळाव्याचे आयोजक चिटणीस भाजपा ठाणें शहर जिल्हा विजय भोईर यांनी केले होते. प्रसंगी विनोद भगत, सचिन भोईर, नरेश पवार, समीर चव्हाण, सपना भगत, रोशन भगत, अशोक पाटील, चेतन पाटील, गणेश भगत, पंकज सिंह, सतीश केळशीकर, अजय सिंह, दिलीप भोईर, अशोक गुप्ता, मधुकर पाटील, सीमा भगत, रेश्मा पवार, अंकुश मढवी आदी मान्यवरांनासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे