ब्रेकिंग

दिव्यातील शूरवीर करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी पोलीस दलात भरती.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २५ मे : दिवा शहरात शूरवीर करिअर संस्थेच्या अंतर्गत शूरवीर करिअर अकॅडमी नरेश चौधरी यांनी स्थापन केली आहे. दिवा शहरात गेली चार वर्षांपासून अकॅडमी मुला-मुलींना घडवत असून आज जवळपास 45 पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. दिव्यातील युवावर्ग व तरुण वर्गाला लोकल रेल्वेच्या धाकधूकीच्या प्रवासात गर्दीमध्ये ये-जा करून ठाणे किंवा कल्याण-डोंबिवली सारख्या शहरामध्ये जास्तीची फी देऊन जो आर्थिक व शारीरिक त्रास सहन करत आपले प्रशिक्षण पूर्णकरावे लागत असे याचीच दखल घेऊन संस्थापक नरेश चौधरी यांनी दिवा शहरात शूरवीर अकॅडमीच्या माध्यमातून गेली चार वर्षापासून ते विद्यार्थ्यांना सैन्य भरती प्रशिक्षण, पोलीस भरती प्रशिक्षण अन्य प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अभ्यासिका देखील सुरु करून मोलाचे कार्य केल आहे.

नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये शूरवीर करिअर अकॅडमीचे विद्यार्थी नवनाथ कदम आणि दीक्षिता ओंकार यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून त्यांना अकॅडमीचे संस्थापक नरेश चौधरी सर व सर्व विद्यार्थी वर्ग यांच्याकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला. नवनाथ कदम व दीक्षिता ओंकार या दोन विद्यार्थ्यांना पोलिस पूर्व भरती प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन अकॅडमीचे संस्थापक नरेश चौधरी यांसकडून मिळाले असून आपल्या अकॅडमीत दिवसाला ४ तास मैदानी सराव आणि ४ तास लेखी सराव करत होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे