स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटली तरीही साताऱ्याच्या पवारवाडीला रस्ता मिळेना !
संतोष पडवळ – प्रतिनिधी
सातारा ता १० जून : स्वतंत्र्याची पंच्याहत्तरी ऊलटली तरीही सातारा जिल्ह्यातील पवारवाडी खालची या गावाला पक्का रस्ता न मिळाल्याने आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी डालग्याचीच अम्बुलंस करावी लागत असल्याने नागरीकांची फरपट होताना पहायला मिळत आहे. शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरीक, गरोदर महिला
यांना मोठया प्रमाणात गैरसोईचा सामना करावा लागत असुन वयोवृध्द आजी अचानक आजारी पडल्याने दवाखान्यात आणण्यासाठी ढालग्याची अंम्बुलंस करत चौघांनी खंद्यावर घेऊन पायपीट करून रुग्णालयापर्यत न्यावे लागत आहे. परिणामी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
देश स्वतंत्र होऊन पंच्याहातरी झाली तरी अद्याप डोंगरी भागातील गावे रस्त्यावीना वंचित आहेत हिच शोकांतीका म्हणावी लागेल प्रत्येक येणारे शासन गाव वस्ती घर तिथे रस्ता पोहचविण्याच्या फक्त घोषणाच करताना दिसत असुन त्या हवेतच विरुन जाताना दिसत आहेत अनेक ठिकाणी डांबरवर डांबर थापुन शासकीय योजना राबविताना पहायला मिळतात मात्र अनेक गावे रस्त्यावीना वचिंत आहेत परतंत्र्यातील जिवन जगताना दिसत असतानाही गाव तिथे रस्ता पोहचविण्यात प्रशासन अपयशी होताना दिसत आहे त्यामुळे डोंगरदऱ्यात वसलेल्या पवारवाडी खालची या गावाला आतातारी पक्का रस्ता कोणी करून देईल का प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्ता मार्गी लावण्यासाठी स्थानिकांनकडून आर्त हाक दिली जात आहे. भागुबाई बापुराव पवार या वयोवृद्ध आजी अचानक गंभीर आजारी पडल्याने दवाखान्यात नेण्यासाठी नेहमी प्रमाणे ग्रामस्थ एकवटले त्यांनी ढालग्याला लाकड बांधुन आजीला ढालग्यात ठेवुन पायपीट करत सातारा येथे नेऊन रुग्णालयात दाखल केले. हे स्थानिक लोकप्रतिनिधिंचे अपयश असल्याची प्रतिक्रिया राम पवार यांनी स्पष्ट केली आहे.




