कल्याणमध्ये इमारतीचा स्ल्याप कोसळून ६ ठार तर ४ जखमी.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता २० मे : कल्याणमध्ये तिसगाव रोड परिसरात इमारतीचा स्ल्याप कोसळून ६ ठार तर ४ जखमी झाल्याची घटना घडली आहे. दुपारी 02.15 वाजण्याच्या सुमारास श्री सप्तशृंगी कॉपरेटिंग हाउसिंग सोसायटी, चिकणीपाडा तिसगाव रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी बिल्डिंगचा चौथ्या माळ्यावरील स्लॅप खाली तळमजऱ्यापर्यंत पडल्याने सदर सोसायटीतील एकूण 4 जखमी व 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 1) नमस्वी श्रीकांत शेलार, वय 2 वर्ष, 2) प्रमिला कालचरण साहू, वय 56 वर्ष, 3) सुनीता नीलांचल साहू, वय 38 वर्ष, ४) सुशीला नारायण गुजर वय 78 वर्ष, ५) व्यंकट भीमा चव्हाण वय 42 वर्ष, ६) सुजाता मनोज वाडी. वय 38 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1)विनायक मनोज पाधी वय 4, २) शर्विल श्रीकांत शेलार वय 4 वर्ष, 3) निखिल चंद्रशेखर खरात वय 26 वर्ष, 4) अरुणा वीर नारायण हे गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी कल्याण महानगरपालिकेचे अग्निशामन पथक आणि टी डी आर एफ टीम यांचे मदतीने कार्य सुरू असून कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहे.




