गुन्हेगारीब्रेकिंग

ठाणे पोलिसांकडून चैन स्नॅचिंग, वाहन चोरी, दरोडा व घरफोडी करणारे सराईत अटकेत. एकूण ३६,२९,७२५/- रु चा मुद्देमाल हस्तगत

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता १६ मे : ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विविध पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग, मोटार वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे घडले होते यात सर्वसामान्य जनतेची मालमत्ता चोरी करण्यात आलेली होती. नमुद सर्व गुन्हयांचा गुन्हे शाखेचे मार्फतीने तपास करण्यात येत होता, त्यासाठी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध चालु होता. सदर तपासास गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले आहे.

गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी इराणी टोळी व शिकलगार टोळीचे सदस्यांचे हालचालीवर पाळत ठेवुन इराणी टोळीचे सक्रीय सदस्य १) वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसिम काला, वय ३० वर्ष, रा. आंबिवली कल्याण पश्चिम २) कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी, वय ३३ वर्षे, रा.सदर तसेच शिकलगार टोळीचे सक्रीय सदस्य आरोपीत नामे १) शिवासिंग अमिरसिंग बावरी वय २५ वर्षे, रा. खोणीगाव, ता. कल्याण जि.ठाणे २) पुनमकौर अमिरसिंग बावरी वय ३७ वर्षे रा.सदर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालयाल व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेत दाखल १) दरोडा-०१ गुन्हा २) चेन स्नॅचिंग -२० गुन्हे, ३) मोटार वाहन चोरी ५ गुन्हे ४) घरफोडी चोरीचे-३ गुन्हे असे एकुण २९ गुन्हे उघडकीस आणुन त्यात एकुण ३६,२९,७२५/- रु चे सोन्याचे दागिने, ६ चारचाकी गाडया जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कामगिरी कामगिरी मा. श्री. आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध- १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सपोनि/सर्जेराव पाटील, सपोनि / संतोष उगलमुगले, पोउपनि/किरण भिसे, पोउपनि/विनोद पाटील यांचे पथकाने केलेली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे