गुन्हेगारीब्रेकिंग

देवगावमध्ये खुलेआम गोमांस विक्री – ४८ तासांत कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार – जीवन ज्योत फाऊंडेशनचा इशारा..!

[wps_visitor_counter]

देवगावमध्ये खुलेआम


नेवासा प्रतिनिधी| तालुक्यातील मौजे देवगाव येथील काही भागांमध्ये खुलेआम बेकायदेशीर गोमांस विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याविरोधात जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.गोवंश हत्या बंदी कायदा 1976 नुसार राज्यात गोवंशाची कत्तल, वाहतूक व विक्री निषिद्ध असून, तो दंडनीय गुन्हा आहे. मात्र, देवगावमध्ये हा कायदा धाब्यावर बसवून बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती संबंधित प्रशासनाला वारंवार देण्यात आली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, हे विशेष. निवेदनात म्हटले आहे की, या बेकायदेशीर कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून, गावातील शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत ही गाव पातळीवरील प्रथम जबाबदार यंत्रणा असून, तिच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.जीवन ज्योत फाऊंडेशनने इशारा दिला आहे की, पुढील ४८ तासांत कारवाई झाली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासंदर्भात कोणतीही अनागोंदी निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संपूर्णतः प्रशासनावर राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या वेळी कमलेश नवले पाटील, विशाल शिंदे, नरेंद्र नवथर, राहुल कांगुणे, आप्पासाहेब आरगडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

🎯शांततेसाठी इशारा – उत्तरदायित्व प्रशासनावर:
जीवन ज्योत फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, “गावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्ण जबाबदार प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी असतील.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे