दिव्यात शिंदे गटाच्या शिवसेना शाखाप्रमुखावर अज्ञाताचा जीवघेणा हल्ला.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ६ जुलै : दिवा शहरातील शिंदे गटातील शिवसेना शाखाप्रमुखावर अज्ञाताचा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दिवा शहरातील प्रभाग २८ मधील शिवसेना शिंदे गटातील शाखाप्रमुख जयदास शेलार यांच्यावर अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला करून जबर जखमी केले आहे. सकाळच्या सुमारास जयदास शेलार हे दिवा मानपाडा रस्त्यावरील परशुराम पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीला पेट्रोल भरण्यासाठी जात असताना सोबत आलेल्या सहकारी मित्राला सोडण्याल्या नंतर पेट्रोल भरून पुन्हा आपल्या घराकडे निघताना उजव्या बाजूस मानपाडाच्या दिशेने जाणारी एक सफेद रंगाची नंबर प्लेट नसलेली चारचाकी तेथे थांबून एक अनोळखी इसम त्याच्या हातात लोखडी रॉड घेऊन शेलार ह्यांच्या अंगावर धावून आला. आपल्यावर होणारा वार हात पुढे करत प्रतिकार करताना सदर इसमाने रॉडने शेलार यांच्या हातापायावर मारून जबर जखमी केले. प्रसंगी रस्त्यावरून रिक्षावाला जात असताना त्याने रिक्षा थांबवून सदर घटना पाहत असताना अज्ञात आरोपीने चारचाकी घेऊन मानपाडाच्या दिशेने पलायन केले. सदर रिक्षावाल्याने तत्परता दाखवत जवळच असलेल्या क्लिनिकमध्ये औषध उपचारासाठी शेलार यांना दाखल केले.
सदर घटनेचे गाभीर्य ओळखून मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात बि एन एस गुन्हा क्र 1133/2025 नुसार दाखल केला असून दिवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास सावंत पुढील तपास करत असून अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.