दिव्यात न्यू गुरुकुल कॉन्व्हेट शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ६ जुलै : दिव्यात गॉड गिफ्ट फाउंडेशन ट्रस्ट संचालित न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (मान्यता प्राप्त) या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सन 2010 पासून सुरू असलेली शाळेची पंढरीची वारी ( दिंडी) ही शाळेमधून निघत आहे. आज शाळेपासून ते विठ्ठल रुक्माई मंदिर दातिवली रोड, मंदिरात विठ्ठल भगवान आणि माता रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी वारी ( दिंडी) ही काढण्यात आली. या मध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक पारंपारिक वेशभूषा, देवाचे नामस्मरण करत दिंडीत सहभागी झालेले होते. तसेच पालकांकडून सुद्धा या दिंडीमध्ये प्रत्यक्ष सहभाग दिसून आला त्यांच्या अनुभवानुसार आम्हाला पंढरपूरच्या वारीमध्ये प्रत्यक्षात जाता आले नाही. परंतु आपल्या या वारीमध्ये आमचा सहभाग हा पंढरपूरच्या वारी प्रमाणेच आम्हाला जाणवले त्यामुळे त्यांनी शाळेचे शतशः आभार मानले पालकांनी व विध्यार्थ्यानी स्पष्ट केले. शाळेचे संस्थापक प्रेमचंद म्हात्रे यांनी विठ्ठल रुक्मिणी या मायबाप कडून दिव्यातील सर्व रहिवाशांना चांगले आरोग्य आणि सुख-समृद्धी मिळावे यासाठी आशीर्वाद मागितले.



