ब्रेकिंगमहाराष्ट्र
ब्रेकिंग ; रत्नागिरीतील आरेवारे बीचवर ठाण्यातील चार पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
0
5
1
8
8
8
संतोष पडवळ – ठाणे
ठाणे ता २० जुलै : शनिवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास ठाणे-मुंब्रा येथील चार पर्यटक ज्यात तीन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे, आरे वारे बीचवर बुडाले. मृतांमध्ये उज्मा शेख (१८), उमरा शेख (२९), जैनब काझी (२६) आणि जुनैद काझी (३०) यांचा समावेश आहे. हे तिघेही रत्नागिरीतील नातेवाईकांना भेटायला गेले होते आणि समुद्र खवळलेला असताना आणि पाऊस असूनही ते समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.
पाण्यात खेळत असताना, त्यांना जोरदार लाटांनी वाहून नेले. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. सायंकाळी ७ वाजेपर्यंत चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि त्यांची टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचली

0
5
1
8
8
8



