ब्रेकिंगराजकिय

दिवा स्टेशन जवळील दुर्लक्षित तलावाचे तात्काळ सुशोभीकरण करा- दिवा भाजप. दिवा भाजप शिष्टमंडळाची स्थानिक आमदार राजेश मोरे यांची घेतली भेट.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २५ जुलै : एकेकाळी दिवा शहराचा मानबिंदू असलेला दिवा स्टेशन परिसरातील तलाव गेली 17 ते 18 वर्षांपासून मृत अवस्थेत होत चालला आहे , तलाव परिसरात भरणी करून त्याचे पात्र बुजवून अनधिकृत गाळे बांधण्यात आले आहेत , स्टेशन परिसरात बसणारे मच्छी विक्रेते , भाजी वाले त्यात घाणीचे पाणी व इतर कचरा टाकत आहे. कधीकाळी संपूर्ण दिवा शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन या तलावात होत होते. स्थानिक रहिवाशांच्या इतर सर्व विधी तलावावर संपन्न होत होत्या , परंतु आजची स्थिती खूपच भयाण आहे , संपूर्ण तलाव आणि आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्टेशनवरून ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

आज स्थानिक आमदार श्री. राजेश मोरे यांची दिवा भाजप शिष्टमंडळाने भेट घेऊन तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यासाठी निवेदन दिले. तसेच लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा चे आगमन होणार आहे , गणेशोत्सवकाळात श्री.गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची मागणी देखील दिवा भाजप च्या वतीने करण्यात आली , आमदार साहेबांनी देखील सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर आपण निधीची उपलब्धता करू असे आश्वासन दिले.

प्रसंगी भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ अध्यक्ष श्री. सचिन भोईर , श्री. अशोक बाबुराव पाटील ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री गणेश पद्माकर भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री.रोशन भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री.दिलीप भोईर माजी मंडळ अध्यक्ष , श्री समीर नारायण चव्हाण दिवा मंडळ सरचिटणीस , श्री.अंकुश मढवी , जयदीप भोईर व्यापारी सेल अध्यक्ष , श्रीधर पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष , अजय सिंग अशोक गुप्ता उ.भा.मोर्चा अध्यक्ष , आदी पदाधिकारी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे