आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिवा पश्चिमेतील पाणी पुरवठा सुरळीत करून अनधिकृत नळ जोडण्यावर तात्काळ कारवाई करा – स्नेहा अमर पाटील ( नगरसेविका )

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता १६ एप्रिल : दिवा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील अनधिकृत व चोरीचे नळ जोडण्या तात्काळ खंडित करून पाणी माफ्यांवर कारवाई करावी तसेच दिवा पश्चिम परिसरात पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचा दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिवा गावाला विशिष्ट पाणी पुरवठा करणारी १२ इंच व्यासाची जलवाहिनीवर दिवा पुर्व बाजुला रेल्वे लाईनला समांतर , रेशनिंग दुकान ते रेल्वे कलवर्ट परिसरात गेला अनेक महिन्यांपासुन अनधिकृत व चोरीचे नळ जोडणी काही पाणी माफ्यांनी केली आहे. त्यामुळे दिवा गावातील बहुतांश भागात गेल्या अनेक महिन्यापासुन अनियमित पाणी पुरवठा व काही भागात अजिबात पाणी पुरवठा होत नाही . तसेच दिवा पश्चिमच्या ईतर बहुतांश परिसरात अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, दिवा गावाला नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा दृष्टीने पाणी पुरवठा विभागा मार्फत रेल्वे लाईनला समांतर जलवाहिनीवरील नळ जोडणी तोडुन पाणी माफ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी व दिवा पश्चिमकडील
इतर परिसराला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा दृष्टीने कार्यवाही व उपाय योजना करण्यासाठी नगरसेविका स्नेहा अमर पाटील यांनी दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांचाकडे निवेदन देऊन मागणी केली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे