आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यात ठाणे महापालिका बांधणार इंग्रजी शाळा

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ -प्रतिनिधी

ठाणे, दि.१६ : ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनला असताना दिवा परिसरात नवीन इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सुमारे ६२ अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांना आवश्यक शासकीय मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी महापालिकेने पर्यायांचा शोध सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात नवीन इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवा परिसरात शाळेसाठी आरक्षित भूखंड उपलब्ध झाल्यास तेथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज शाळेची इमारत उभारता येईल, असा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ही प्रस्तावित शाळा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर अनुभवी खासगी संस्थेमार्फत चालविण्याचाही विचार करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी २६ डिसेंबर २०२५ रोजी मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रस्तावासाठी दिवा प्रभागातील मौजे डावले येथील सर्व्हे क्रमांक १२२, हिस्सानंबर ३-अ मधील ३६५० चौरस मीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. मंजूर विकास आराखड्यात हे क्षेत्र प्राथमिक शाळा आरक्षण क्रमांक ७ अंतर्गत आरक्षित असून स्थावर मालमत्ता विभागाने ही जागा शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे