आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यातील १२ वर्षीय देवेंद्रच्या मृत्यूप्रकरणी डॉ. शिशिर रॉयवर गुन्हा दाखल. सह. आयुक्त औषधे कोकण विभाग आणि वैद्यकीय अधिकारी ठाणे महानगरपालिका यांना निवेदन

0 5 1 8 8 7

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ९ जून : बारा वर्षीय देवेंद्र आशिष सिंग यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यां विरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात दिव्यातील बंगाली डॉक्टर शिशिर रॉय यांच्यासह अन्य एका डॉक्टरविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा परिसरातील इतर बोगस डॉक्टरांवरही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.

धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संस्थापक अमोल धनराज केंद्रे आणि मुंब्रा शहराध्यक्ष युसुफ जंगबारवाला यांनी डॉ. प्रसाद पाटील यांची भेट घेऊन तसेच आज श्री भूषण पाटील सह आयुक्त (औषधे)
कोकण विभाग ठाणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.

देवेंद्र सिंग यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बोगस मेडिकल दुकाने तसेच अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईसंदर्भात शासनाकडून आदेश अथवा पत्र प्राप्त झाल्यास आरोग्य विभाग, तत्काळ कार्यवाही करेल. दरम्यान, देवेंद्र आशिष सिंग यांच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवून पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर आणखी योग्य ते गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात सह आयुक्त अन्न औषध विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा, मुंब्रा, कळवा व ठाणे शहर भागात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून बोगस डॉक्टर, बोगस मेडिकल दुकाने आणि इतर अनधिकृत वैद्यकीय व्यवसायांवर व्यापक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्या आदेशानुसार डॉ. पल्लवी वाघ यांच्या पथकाने ४ जून २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता संजय म्हात्रे यांच्या शिवसेना शाखेमध्ये टेबल, खुर्च्या तसेच काही इंजेक्शने व औषधे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान त्या ठिकाणी बोगस डॉक्टर शिशिर रॉय बसून नागरिकांवर उपचार करत असल्याचे शाखाप्रमुख संजय म्हात्रे यांनी सांगितल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही देवेंद्र सिंग यांच्यावर शिशिर रॉय यांनी उपचार केल्याचे समोर आले असून त्यानंतर मुलाची प्रकृती खालावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित सर्व पुरावे तपासले जात आहेत. धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने मृत देवेंद्र आशिष सिंग यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी तसेच आरोपी शिशिर रॉय यांची मालमत्ता जप्त करून पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देवेंद्रच्या मृत्यूमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या प्रकरणातील आगामी कारवाईकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

5/5 - (1 vote)

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे