आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत यांच निधन

[wps_visitor_counter]
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ७ मे : आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष कै गोविंद भगत यांचे आज सकाळी ८ : ३० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. दिवा शहरात राहणारे तसेच नेहमी आगरी समाजासाठी लढणारे नेतृत्व म्हणून कै. गोविंद भगत हे परिचित होते. आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र ६/७ वर नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता तेथेचे त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली फलाटावर कोसळले. प्रसंगी त्यांना तातडीने ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले प्रसंगी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने दिवा शहरात शोककळा पसरली आहे..
[wps_visitor_counter]



