ब्रेकिंग ; दिवा शीळ गावात शॉर्टसर्किट झाल्याने घरसामान जळून खाक
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा : दिनांक ०६/०८/२०२५ रोजी ०२:१५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार गीताई अपार्टमेंट, तुळजाभवानी मंदिर जवळ, दिवा रोड, शीळ गाव, शीळ, ठाणे. या ठिकाणी गीताई अपार्टमेंट, (तळ+०५ मजली इमारत) या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक:-२०६ (मालक:- श्री. जयेश काटे) या रूममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह, ०१- फायर वाहनासह व टोरंट विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
(सदर रूममध्ये कोणीही राहत नसून रूममध्ये घरगुती साहित्य स्टोअर करून ठेवण्यात आले होते.)
(सदर घटनास्थळी आग लागल्यामुळे सदरच्या रूम मधील टेलिव्हिजन, फ्रीज, लाकडी कपाट, लाकडी टेबल, इलेक्ट्रिक वायरिंग व इतर घरगुती साहित्य पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे.) सदर घटनास्थळी रूममध्ये लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांचे मदतीने ०२:५८ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.




