ठाण्यात पेपर कपवर वापरणाऱ्या हॉटेल व चहा टपरीवर दंडात्मक कारवाई होणार !
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ३१ मार्च : ठाण्यात पेपर कपवर वापरणाऱ्या हॉटेल व चहा टपरीवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने आदेश काढले आहे. पत्रकार विशाल कुरकुटे यांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांना परिपत्रकाद्वारे हॉटेल्स व चहा स्टॉल्सवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाणे महानगरपालिका यांनी शहरातील हॉटेल्स व चहा स्टॉल्समध्ये चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपर कपविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. पत्रकार विशाल कुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. शहरातील अनेक ठिकाणी चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेपर कपचा वापर होत असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अशा कपमधील रसायनांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व हॉटेल्स व चहा स्टॉल्सवर कारवाई करून दंड आकारला जाणार आहे. संबंधित विभागांना तात्काळ तपासणी करून नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठाण्यातील चहा विक्रेत्यांनी आता नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महापालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय ठरत आहे.



