आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेते संतोष जाधव यांना मातृशोक

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता १७ मे : ठाणे शहरातील अलमेडा सिग्नल सर्व येथील वृत्तपत्र विक्रेते संतोष हरिश्चंद्र जाधव यांच्या मातोश्री वनिता हरिश्चंद्र जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्या 67 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र विक्रेता आणि वितरण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 1999 पासून ठाण्यातील अलमेडा सिग्नल परिसरात त्या वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत होत्या. संतोष जाधव हे दिव्यांग वृत्तपत्र विक्रेते असून अथक परिश्रमाने त्यांनी वृत्तपत्र विक्री व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळला होता. त्यांचे आई-वडील हरिश्चंद्र जाधव व वनिता जाधव यांनी मोलाची साथ दिली. वृत्तपत्र विक्रेते व्यवसाय करत असताना संतोष जाधव यांनी ठाणे महापालिकेमार्फत दिव्यांगांचा स्टॉल चालवून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला. दरम्यान, कोरोना काळात वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय कोलमंडला होता. अशातही त्यांच्या मातोश्री वनिता जाधव यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून साथ दिली. मात्र गेल्या काही वर्षांपासून असाध्य आजाराने वनिता जाधव यांना घेरले. त्यांची मुलं संतोष जाधव व संदीप जाधव यांनी उपचारासाठी अथक प्रयत्न केले मात्र रविवारी दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. संतोष जाधव हे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये अत्यंत सामाजिक आणि सलोख्याने वागणारी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ व ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना यांच्या वतीने वनिता जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली जाधव कुटुंबाच्या सहभागी असण्याची भावना व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे