ब्रेकिंग

ब्रेकिंग : ठाण्यातील वागळे भागात घरात आग लागल्याने एकाच दुर्दैवी मृत्यू.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ३० ऑक्टो : दि. २९/१०/२०२५ रोजी रात्री ९ : ४५ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिर जवळ, रोड नं.२७, शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे (प.) या ठिकाणी प्रथमेश अपार्टमेंट (तळ+ ०४ मजली) च्या ४ थ्या मजल्यावरील रूम नं. ४२ (मालक – श्री. सचिन निकम) मध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी महावितरण कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहन व ०१- रेस्क्यू वाहनासह तसेच ०१- खासगी रुग्णवाहिका उपस्थित होती. सदर घटनेत श्री. सचिन निकम (पु / ४५ वर्षे) यांना भाजले असून उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी आग लागल्याने घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, सीलिंग फॅन, गाद्या, इत्यादी साहित्य जळून नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून १० :१० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे