ब्रेकिंग

ठाण्यात आधार सहकारी पतपेढीची ३१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न.

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २४ ऑगस्ट : आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगस्ट रोजी नुरी हॉल, मखमली तलाव, चंदनवाडी, ठाणे येथे अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. प्रसंगी संस्थेची अद्यावत स्थिती, पाच शाखांचे ८४८३ सभासद संख्या, संस्थेचे खेळते भांडवल १२२ कोटी, जुलै पर्यंत संमिश्र व्यवसाय १७५ कोटी व निव्वळ नफा १.२२ कोटी झाला असून संस्थेने “अ” वर्ग राखला आहे. प्रसंगी इतिवृत मंजूर करणे, लेखापरीक्षण करणे, दिलेली व वसूल कर्जे, संस्थेचा नफा व तोटा तसेच यावेळी १२% लाभांश मंजूर करण्यात आला. आठ हजार पेक्षा जास्त सभासद असलेल्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेस अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांचा अध्यक्ष भरतशेठ दांगट यांच्यासह इतर उपस्थित संचालकांकडून सन्मान करण्यात आला.

प्रसंगी मा. ॲडिशनल कलेक्टर श्री शिवाजीराव दावभट, विलास डुंबरे सेवानिवृत्त म्हाडा इंजिनिअर, सौ तनुजा मस्करे (सदाकाळ) कक्ष अधिकारी वित्त विभाग मंत्रालय, किसनराव भोसले महानगर बँक, तानाजी पानसकर (शहर विकास अधिकारी) दादाभाऊ रेपाळे, अँड भाऊसाहेब शेळके, अँड विजय वाघमारे, सौ शोभा वामन, समाजसेवक सुधीरजी मोहनलाल कोटक यासह अनेक ठेवीदार व सभासद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर सर्व सभासदांसाठी शनिवारी ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता शुभश्री हॉल, अहिनवेवाडी फाटा, कल्याण नगर हायवे, ओतूर, जुन्नर (पुणे) येथे सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व मेळावा आयोजीत केल्याची माहिती अध्यक्षानी दिली तदनंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व संस्थेतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे