ठाण्यातील कै. निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रम शाळेत प्रजासत्ताकदिना निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.
संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २७ जाने : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कै. निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रम शाळा येथे लहान विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ८.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना फ्रुटी, बेल बॉण्ड, ब्रिटानिया बिस्किटे व बालाजी वेफर्स यांचे वाटप करण्यात आले. समाजात सेवाभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, तसेच लहान वयातच देशभक्तीचे संस्कार रुजावेत, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सदर खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनेश बुचुडे, दीपक तेली, संजय गुप्ता, विनय प्रजापती व विशाल कुरकुटे यांच्या वतीने करण्यात आले. शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी आयोजकांच्या या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.



