क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

युवासेना दिवा शहर आयोजित गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. सिद्धिविनायक मित्र मंडळाने पटकावले प्रथम पारितोषिक.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २८ सप्टें : युवासेना दिवा शहर यांच्या माध्यामातून अभिषेक ठाकूर शहर अधिकारी युवासेना दिवा शहर यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुमित हॉल दिवा येथे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर स्पर्धेमध्ये दिवा शहरातील ३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश, उत्कृष्ट सजावट, सण उत्सवाची परंपरा जपणे अशा विविध विषयांवर परीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय यांस सन्मानचिन्ह व रोख रक्कम स्वरुपात बक्षीसे देवून प्रोत्साहित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक मित्र मंडळ हे प्रथम क्रमांक पटकावत विजयी झाले असून त्यांना सन्मान चिन्ह , रोख रक्कम दहा हजार रुपये तसेच प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक अचानक मित्र मंडळास रोख रक्कम सात हजार, सन्मान चिन्ह तसेच प्रशस्ती पत्र व तृतीय क्रमांक मिळविलेल्या श्री एकरूप मित्र मंडळास रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी उपजिल्हाप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे रमेश पाटील, उपजिल्हा संघटीका माजी नगरसेविका अंकिता पाटील, सुमित सुमित भोईर, विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, शहरप्रमुख सचिन पाटील, महिला विधानसभा संघटीका योगिता नाईक, महिला शहर संघटीका ज्योती पाटील, महिला शहर समन्वयिका प्रियांका सावंत, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, युवासेना शहर सचिव उमेश राठोड, विभागप्रमुख चेतन पाटील, संजय जाधव, योगेश निकम, रवी रसाळ, विभाग सांघटिका प्रिया भोईर, अजित माने, अमोल पाटील, अशोक अमोंडकर, संजय अर्दाळकर, नितीन सावंत, प्रवीण उतेकर तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे