संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १० ऑगस्ट : अखेर दिवा चौकाचे दोन्हीही पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक नामांतर.
दिवा शहरातील दिवा चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक नामांतर करण्याची अनेक शिवप्रेमींची मागणी होती. सदर मागणीसाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन दिवा चौकाचे आज नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात करण्याचे आयोजित करण्यात आले असताना दिवा शहर शिवसेनेने देखील गेली तीन चार वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता परंतु चौकाचे नामकरण करत नसल्याने मनसेने नामकरण सोहळा आयोजित केला. दिवा मनसेने ढोल ताशाच्या गजरात तसेच शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या स्वरूपात व मनसेचे प्रकाश पाटील व तुषार पाटील यांच्या हस्ते नामकरण केले तर त्याच ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या हस्ते देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले.
प्रसंगी मनसेचे तुषार पाटील यांनी तीव्र शब्दात सत्ताधारी पक्षाला खडेबोल सुनावले आम्ही प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा नामकरण सोहळा आयोजित केला असताना येथे शिवसेना पक्ष सत्ताधारी असून देखील त्यांना तीन चार वर्षांपासून करता आले नाही ते आज येथे “आयता बिळावर नागोबा “येथे येऊन डिवचण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे जनता तथा दिवेकरांना नामांतर कोणी केल चांगले लक्षात ठेवील असे स्पष्ट केले.
दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा अशी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमींची जुनी मागणी आहे. दिवावसीयांच्या लोकभावनेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी त्यासंदर्भात ठराव महापालिकेत प्रशासनाकडून करून घेतला असून ठाणे महानगर पालिका यांनी जारी केलेल्या ठराव पत्र २५/०७/२०२४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामी सद्यस्थितीत विभागामार्फत शिल्पकाराची निवड करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे शिवसनेचे आदेश भगत यांनी स्पष्ट केले.




