गुन्हेगारीब्रेकिंग

दिव्यात खाडी किनारी गावठी दारू बनवणारी हातभट्टी उद्वस्थ. दिवा पोलिसांनी केला ८ लाखांचा मुद्देमाल नष्ट.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २८ ऑगस्ट : ऐन गणेशउत्सवात दिवा शहरात खाडी किनारी गावठी दारू बनवणारी हातभट्टी केंद्रे दिवा पोलिसांच्या टीमने उद्वस्थ केले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा पोलिसांनी सदर कारवाईत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य व दारू असे जवळपास ८ लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

दिवा पूर्व, गणेश नगर खाडी पट्ट्यात अवैध गावठी हातभट्टी गाळप केंद्र सुरू असल्याची गोपनीय माहिती दिवा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यावरून दिवा पोलीस चौकी येथील सपोनि वसंत खतेले, सपोनि अमोल कोळेकर, सपोनि राजेंद्र तोरडमल, पोउपनि सुभाष मोरे, पोलीस अंमलदार गोविंद मुंढे, जयेश तामोरे, महेश जाधव, वसीम तडवी, निळकंठ लोंढे यांचेसह गणेशनगर-आगासन दिवा पूर्व यादरम्यानचे खाडी परिसरात पंचांसह जाऊन पाहणी केली असता, गणेश नगर खाडीपट्ट्यातील दलदलीमध्ये गावठी हातभट्टी गाळप कारखाना व 200 ड्रम दारू बनविण्याचे रसायन (3600 लिटर) मिळून आले. याबाबत इ साक्ष एप्लीकेशन मध्ये व्हिडिओ ग्राफी करून व सविस्तर पंचनामा करून गावठी हातभट्टी गाळप कारखाना, दोनशे ड्रम आणि त्यामधील दारू निर्मितीचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे