आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप उतेकर यांच्या प्रयत्नांना यश ; धोकादायक गतिरोधक हटवला ; अपघातांच्या मालिकेनंतर प्रशासनाला जाग

[wps_visitor_counter]

 

नेरळ : सुमित क्षिरसागर

नेरळ दि. ३ एप्रिल २०२६ :
कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ हद्दीत बुरहानी पार्क परिसरात उभारण्यात आलेला वादग्रस्त आणि धोकादायक गतिरोधक अखेर हटवण्यात आला आहे. सलग अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू आणि तीन जण गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली.

सदर गतिरोधकाची रचना नियमबाह्य व अत्यंत धोकादायक असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. अचानक उंच व अनियमित ब्रेकरमुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटत असल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी या ठिकाणी अपघातांची नोंद नव्हती.

या गंभीर प्रकाराची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपशहर प्रमुख संदीप उतेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देत हा जीवघेणा गतिरोधक तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने संबंधित ठिकाणी पाहणी करून अखेर हा गतिरोधक हटवण्याचा निर्णय घेतला.

स्थानिक नागरिकांनीही रस्त्यावर उतरून तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. वाढता दबाव आणि अपघातांची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाला अखेर कारवाई करावी लागली.

गतिरोधक हटवण्यात आल्यानंतर वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “उशिरा का होईना, पण योग्य निर्णय घेतला,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, रस्ते बांधकाम करताना नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे