दिव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार केंद्र सुरु.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १० : दिवा शहरात सांची न्युरोपॅथी अॅक्युपंक्चर व धडाकेबाज युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपक्रम सुरु झाला आहे. हा उपक्रम समाजसेवेच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद आहे. या उपक्रमांतर्गत न्युरोपॅथी व अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ. प्रमोद जाधव यांच्या माध्यमातून हाडे-सांधे व मज्जासंस्थेवरील उपचार पूर्णपणे मोफत सुरु झाले आहेत. या उपचारांमध्ये अर्धांगवायू, तीव्र गुडघेदुखी, सायटिका, कंबरदुखी (लंबर स्पॉन्डायलोसिस) व मानदुखी (सर्व्हायकल स्पॉन्डायलोसिस) कंबरदुखी, नस दाबणे, पाठ दुखणे, मणक्याचे आजार, सांध्यांची झीज, गुडघे दुखी, खांदा दुखणे, फ्रोजन शोल्डर, संधिवात, हात-पायाला मुंग्या येणे, लकवा, मुळव्याध, मधुमेह, गॅसत्रिक, वजन वाढणे / कमी होणे, स्त्रियांचे सर्व आजार, चेहऱ्यावरील डाग, वंध्यत्व, पोटाचे विकार, थायरॉईड, हार्ट, लिव्हर, किडनी, त्वचा, नेत्र, कान, नाक, घसा विकार अशा आजारांवर प्रभावी उपचार करण्यात येत आहेत.
सर्व उपचार नैसर्गिक पद्धतीने, औषधांशिवाय, कोणतेही साईड इफेक्ट न होता सुरक्षितरीत्या केले जात आहेत. हा उपक्रम दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू असून १० फेब्रुवारी २०२६ ते २०३० या कालावधीत दीर्घकालीन स्वरूपात राबविण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे, सौ अश्विनी अमोल केंद्रे, कार्याध्यक्ष अभयलाल दुबे, उपसचिव राजूप्रसाद गुप्ता, उपखजिनदार अनिल मौर्या , प्रियेश धाडवे, रणजीत मौर्या यांनी डॉ प्रमोद जाधव यांचे अभिनंदन व सत्कार करून आज पासून जेष्ठ नागरिकांच्या उपचारास शुभारंभ सुरू केला. ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. “आरोग्य तुमचे – काळजी आमची!” या ब्रीदवाक्यानुसार हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सदर क्लिनिक ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात शॉप नंबर १, जगन्नाथ धाम अपार्टमेंट, सेंट मेरी शाळेसमोर, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा पूर्व येथे सुरु झाले असून अधिक माहितीसाठी डॉ प्रमोद जाधव मो. 9623175583 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



