ब्रेकिंग

ब्रेकिंग : दिव्यात शॉर्टसर्किट होऊन बेकरी जळून खाक.

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा : दिनांक ०४/११/२०२५ रोजी ००:०२ वाजताच्या सुमारास कावेरी ज्वेलर्स समोर, गणेश मंदिर जवळ, गणेश नगर, दिवा आगासन रोड, दिवा, ठाणे. या ठिकाणी न्यू बेंगलोर अय्यंगार बेकरी (शॉप नंबर -३, तळ +१ मजली, मालक:- श्री. चेतन आलप) या दुकानाला आग लागली आहे. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस कर्मचारी, टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, ०१- रेस्क्यू वाहनासह उपस्थित आहेत. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी दुकानांमध्ये आग लागल्यामुळे दुकानांमधील एसी, कपाट व इतर खाद्यपदार्थ जळून नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्याकडून विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे