आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

 🎯 ब्रेकिंग ; अखेर बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश ; दिवा शहरातील ५ डॉक्टर्ससह ठाण्यात एकूण २४ संशयित डॉक्टर्सवर कारवाई.

0 5 1 8 8 7

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ७ जून : ठाणे महापालिकेने शहरातील बोगस डॉक्टरांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २४ संशयित बोगस डॉक्टरांचा शोध लागल्याने आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः घोडबंदर, दिवा आणि मुंब्रा परिसरात अशा डॉक्टरांचे जाळे अधिक असल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध विभाग समिती हद्दीत केलेल्या तपासणीत माजिवडा-मानपाडा विभागात सर्वाधिक ६, तर दिवा आणि कळवा विभागात प्रत्येकी ५ संशयित बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाईची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मार्च महिन्यात झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विशेष पथकाची नियुक्ती करून शहरातील क्लिनिक आणि दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक जण वैद्यकीय पदवी नसतानाही उपचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ठाणे महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे १,४५२ दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत संशयित डॉक्टरांची नावे, पत्ते आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती संकलित करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनीही उपचार घेताना डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता आणि नोंदणी तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1.5/5 - (2 votes)

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे