राजकिय

महाराष्ट्र वितरक सेनेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ (मुंबई)

मुंबई ता १६ जून : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित महाराष्ट्र वितरक सेनेचा बारावा वर्धापन दिन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे रविवार दि.१५.०६.२०२५ रोजी थाटामाटात संपन्न झाला. या वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते आणि अंगीकृत संघटनेचे समन्वयक श्री. भाऊ कोरगावकर आणि माजी आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर उपस्थित होते. श्री. भाऊ कोरगावकर यांनी महाराष्ट्र वितरक सेनेच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष श्री. दिलीप बाम्हणे यांनी वितरक सेनेच्या गेल्या बारा वर्षाच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील उपक्रमाची माहिती विशद केली. वितरक सभासदांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या झेंड्याखाली एकजुटीने उभे राहावे असे आवाहनही श्री दिलीप बाम्हणे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात केले. याप्रसंगी अष्टविनायक विघ्न क्रिएशन निर्मित *वजनदार* नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. हेमंत पवार यांनी केले. याप्रसंगी सरचिटणीस श्री. अरविंद नाईक, खजिनदार श्री. महेश शिराळी, सल्लागार व उपसचिव श्री. प्रवीण महाले, सल्लागार श्री. योगेंद्र ठाकूर, कार्याध्यक्ष श्री. सचिन जीनगीरे, सचिव श्री. संतोष देवरुखकर, श्री. राजीव नाईक, श्री. सुनील सावंत, श्री. दिलीप दळवी, सुबोध गडकरी,अरूण ढवळे, गिरीश शहा,शंभुभाई बारीया, गणेश तळेकर, प्रकाश मोहिते,संजय परब,मंगल राऊत आणि अभिनेत्री कुमारी अक्षया नाईक उपस्थित होत्या.

🎯 महाराष्ट्र वितरक सेना शिवसेना हया चार अक्षरांशी कटीबद्ध आहे आणि उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्षाला बळकटी देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील असे वितरक सेनेचे अध्यक्ष दिलीप बाम्हणे यांनी सांगितले

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे