ब्रेकिंग : ठाण्यातील चितळसर पोलिस स्टेशनसमोर तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ असा आरोप.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ७ ऑक्टो : ठाण्यातील चितळसर पोलिस स्टेशन येथे एक धक्कादायक घटना घडली. कु. योगिता गजभिये यांनी स्वतःवर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
प्राथमिक माहितीनुसार, संतोष जैस्वाल या आरोपीवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप गजभिये यांनी केला आहे.
योगिता गजभिये यांचे म्हणणे आहे की, संबंधित आरोपीवर कारवाई न करण्यामागे स्थानिक सूत्रांकडून कळाले आहे की,राजकीय नेते निरंजन डावखरे यांचा दबाव असल्याचा संशय आहे. या अन्यायाविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी चितळसर पोलिस स्टेशनसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून गजभिये यांना वाचवले व पुढील चौकशी सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, आरोपीवर तात्काळ एट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी व जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.




