ब्रेकिंग

दिवा प्रभाग समितीतील मालमत्ता कर विभागातील लूट तात्काळ थांबवा – ऍड रविराज बोटले.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ६ नोव्हें : दिवा प्रभाग समितीतील शास्ती (Penalty) च्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली आर्थिक लूट व भ्रष्टाचाराबाबत तात्काळ चौकशी करून सबधित अधिकाऱ्यावर कारवाई करून होणारा आर्थिक भ्रष्टाचार थांबवा यासाठी ऍड रविराज बोटले आक्रमक होत दिवा प्रभाग समितीमधील मालमत्ता कर विभागात सुरु असलेल्या गंभीर अनियमितता व भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले. सध्या परिस्थितीत प्रभागातील मालमत्ता कर व हस्तांतरण (Mutation) प्रकरणांमध्ये, सरकारकडून अंतिम आदेश/परिपत्रक स्पष्ट नसल्याचा फायदा उचलत काही कर्मचारी नागरिकांवर शास्ती (Penalty) लावण्याचे नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत आहे तसेच असे दिसून येत आहे की-जे नागरिक बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने मागील दरवाजातून पैसे देतात, त्यांच्या फाइल्स त्वरित हस्तांतरित केल्या जात आहेत.व जे सामान्य नागरिक अतिरिक्त पैसे देण्यास नकार देतात, त्यांच्या फाइल्स “शास्ती भरली नाही” अशा कारणांवर निकाली काढल्या जात आहेत त्यामुळे, नागरिकांचा प्रचंड छळ, मानसिक त्रास व आर्थिक शोषण चालू आहे.ही बाब संपूर्ण प्रभागातील सार्वजनिक हिताची असून त्वरित तपास व लेखा परीक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे.

दिवा प्रभाग समितीतील मालमत्ता कर विभागातील मागील सहा महिन्यांतील सर्व मालमत्ता हस्तांतरण(Mutation Entries) ची सखोल चौकशी व ऑडिट करण्यात यावे तसेच भ्रष्टाचारात सामील असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांची ओळख करून त्यांच्या विरुद्ध कडक शिस्तभंग कारवाई व फौजदारी प्रक्रिया राबविण्यात यावी,पुढील काळात मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाईन व नागरिकाभिमुख पद्धतीने करण्यात यावी,वरील बाबींची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असे यावेळी ऍड बोटले यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे