आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्गाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा.  २३ एप्रिल २०२६ रोजी बंद ची हाक

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २१ मार्च : भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्या वतीने दि.२३ मार्च २०२६ रोजी भारतातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा निघणार आहे. भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांकडून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणेसाठी केंद्रशासनाने जे नोटिफिकेशन केले त्यात ओबीसी प्रवर्गातील जातींची नोंद होईल असा रकानाच नसल्याने केंद्रशासनाकडून ओबीसींची दिशाभुल, युजीसी कायदा करण्यात आला परंतु सुप्रीम कोर्टात तकलादु युक्तिवाद करण्यात आला. यामुळे एस.सी, एस.टी. व ओबीसी विद्यार्थ्यावर अन्याय तसेच सन २०११ पुर्वी शिक्षक म्हणुन लागलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षेतुन (TET) या परिक्षेतुन वगळण्यात यावे आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास दि. २३ एप्रिल २०२६ रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

सदर मोर्चा उल्हासनगर येथील सुभाष टेकडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते गुरू नानक शाळा, नेताजी चौक गांधी रोडमार्गे तहसील कार्यालय येथे समारोप होणार असून ठाणे जिल्ह्यातील सर्व ओबीसी, विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकांच्या परिवारातील सर्व बंधु व भगिनींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शैलेश सालवे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे