आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

मुंब्र्यात भरधाव दुचाकी आपघातात २ ठार तर १ गंभीर.

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ७ एप्रिल : मुंब्रा येथील एम एम व्हॅली रोडवर बसला धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी मुंब्रा येथील एम एम व्हॅली रोडवर हा आपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तीन तरुण स्कूटरवरून भरधाव वेगाने जात असताना त्यांची बसला धडक बसली ज्यामुळे दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात मृत तरुणाचे नाव संगम (वय २० वर्षे) तर दुसऱ्या तरुणाचे नाव अविनाश (वय १९ वर्षे) असून जखमी झालेल्या तिसऱ्या तरुणाचे नाव महेश (वय १८ वर्षे) असल्याचे सांगितले जात आहे. हे तीनही तरुण मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागातील राहणारे असून घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा तयार केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवला. प्रकरणी अपघात कसा घडला आणि त्यात कोणाची चूक होती याचा तपास पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे