कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी नमिता घारे तर उपसभापतीपदी चित्रा ठाकरे
कर्जत पंचायत समितीत बिनविरोध निवड; विकासाला गती देण्याचा नवा संकल्प
कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत दि.१२ मार्च : कर्जत पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक आज दिनांक ११ मार्च रोजी पार पडली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार धनंजय जाधव यांनी काम पाहीले तर या कामी त्यांना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार पडलेल्या झालेल्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद गटाच्या सहा जागांपैकी सहा तर पंचायत समिती गणाच्या १२ जागांपैकी १० जागांवर निवडूण येत पंचायत समिती गणाच्या निवडणूकीत बहुमत मिळवले होत. त्यानुसार आज सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे यांनी तर उपसभापती पदासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आपला अर्ज दाखल केला होता. दुपारी १.०० वाजेपर्यंत दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर करून, परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नमिता सुधाकर घारे यांची सभापती पदी तर शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची उपसभापती बिनविरोध निवडण ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार धनंजय जाधव यांच्याकडून घोषीत करण्यात आले आहे. तर दोन्ही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या शुभेच्छा सोहळ्या करीता रायगडचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते. तर नवनिर्वाचित सभापती नमिता घारे व उपसभापती चित्रा ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख साक्षिणी सभापती व उपसभापती दालनातील पदभार हा ग्रहण करण्यात आले आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती तसेच सर्व सदस्यांचे कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील व अधिकारी व कर्मचारीवर्गाकडून सत्कार करण्यात आला. या निवडीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष त्सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष दिपक श्रीखंडे, अशोक भोपतराव, बंधू पाटील, भगवान भोईर, सुनिल पाटील, रंजना धुळे, नगराध्यक्षा पुष्पा दगडे, शिवसेना उबाठा पक्षाचे उपनगराध्यक्ष संतोष पाटील, रशिका नितिन सावंत आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.



