संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १० नोव्हें : भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत आणि आदर्श मित्र मंडळ आयोजित दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षिस समारंभ रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दिवा शहरातील ग्लोबल शाळेच्या भव्य मैदानावर शिवप्रेमींच्या आणि दिव्यातील तमाम जनतेच्या प्रचंड उपस्थित मोठ्या उत्साहात दिमाखदार सोहळा पार पडला. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तिसाई मित्र मंडळ गणेश पाडा ,शिवबा राजे प्रतिष्ठान बेडेकर नगर आणि अचानक मित्रमंडळ साबेगाव हे सयुक्त रित्या द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, क्षत्रिय कुलवंतस प्रतिष्ठान आगासन आणि नवतरुण मित्र मंडळ बेडेकर नगर हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले, गडप्रेमी ग्रुप वक्रतुंड नगर आणि काळूबाई मित्र मंडळ म्हात्रे गेट हे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले तर शिवप्रेरणा ग्रुप नाईक नगर आणि गावदेवी चाळ बेडेकर नगर यांना ही पाचवा क्रमांक विभागून देण्यात आला.
सदर भव्य दिव्य गड किल्ले बांधणी बक्षिस समारंभात दिवा भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सपना भगत व रोशन भगत यांनी अनेक शिवप्रेमी संघटना व सामाजिक संघटनासह राजकीय मान्यवरांचे अभिनंदन व स्वागत केले. प्रसंगी ठाणे जिल्हा मा. अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे जिल्हा सरचिटणीस मा. मनोहर सुखदरे ,भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, ठाणे भाजपा सरचिटणीस विक्रम भोईर, भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिलीप भोईर, अंकुश मढवी, रेश्मा पवार, नरेश पवार, जयदीप भोईर, श्रीधर पाटील, समीर चव्हाण, जिलाजीत तिवारी, नितीन कोरगांवकर, प्रकाश पाटील, रवी मुणंनकर, किरण कोरगांवकर, अनिल गावकर, अनंत पडेलकर, स्वप्नील धुमाळ, राकेश मिश्रा, विशाल गुप्ता आणि भाजपा महिला मोर्चाची संपूर्ण टीम आदि उपस्थित होते. सदर भव्य दिव्य समारंभाचे सूत्रसंचालन निवेदिका करुणा सचिन गगे यांनी आपल्या मनमोहक आणि भारदस्त आवाजाने कार्यक्रमाला एक वेगळ्याच उंचीवर नेले होते.




