मध्य रेल्वेवर उद्या १३ तासांचा मेगा ब्लॉक, ३४ मेल-एक्स्प्रेस रद्द.

प्रतिनिधी – अश्विनी तेलंगे
मुंबई : मध्य रेल्वेने आटगाव ते कसारा दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने पॅनल हटवण्यासाठी १३ तासांचा विशेष ब्लॉक घोषित केला आहे.
मुख्य मुद्दे:
ब्लॉकचा कालावधी : ६ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून ७ जून रोजी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत
परिणाम : एकूण ३४ मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक बाधित होणार
लोकल सेवा: आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहील
रद्द होणाऱ्या प्रमुख गाड्या :
११०११ सीएसएमटी-धुळे एक्स्प्रेस
११०१२ धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस
१२१०९ सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
१२११० मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे-सीएसएमटी गाड्या
लोकल वाहतुकीत बदल :
अंशतः धावणाऱ्या लोकल : ६ जून सकाळी ११:४२ ते रात्री ८:४४ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या कसारा लोकल फक्त आसनगावपर्यंत धावतील
रात्री ९:३२ची कसारा लोकल : खडवलीपर्यंतच
रात्री १०:४७ची कसारा लोकल : टिटवाळ्यापर्यंतच
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल : ६ जून सकाळी १०:१६ सीएसएमटी-कसारा, दुपारी १२:१९ कसारा-सीएसएमटी
ब्लॉकनंतरची पहिली लोकल : ७ जून पहाटे ४:१९ सीएसएमटी-कसारा, पहाटे ३:५१ कसारा-सीएसएमटी
या मेगा ब्लॉकमुळे रविवारी दिवसा मध्य रेल्वेवर अन्य कोणताही ब्लॉक असणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा.



