आरोग्य व शिक्षण

नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व एच.डी.एफ.सी. सिक्युरिटी लिमिटेड यांच्या संयुक्तविद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना साहित्यवाटप.

[wps_visitor_counter]

 

नेरळ : सुमित क्षिरसागर

कर्जत, नेरळ ता १५ जून : एच.डी.एफ.सी. सिक्युरिटी ली. आणि नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव, मंडळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास उपक्रम अंतर्गत, त्यांना शैक्षणिक साहित्य (स्कूलबॅग) चे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन साने सभागृह येथे मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक १४ जून रोजी सायंकाळी करण्यात आले होते. ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. यावेळी एचडीएफसी सिक्युरिटी व नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सभासद चिराग गुप्ता यांच्या पुढाकाराने व मंडळाचे सर्व सभासद व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,
राजा वलेचा,जयवंत साळुंके,केतन पोतदार,विशाल साळुंके,अशुतोष गडकरी, राजेश मिरकुटे,शशिकांत भोईर,श्याम कडव ,आशिष सुर्वे,आदित्य यादव,यतीन यादव,राहुल कालेकर,
दीप देशमुख,रुपेश दाभणे,
राहुल भाटकर,प्रतीक भिसे,
आशिष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

नेरळचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना ही स्वातंत्र्यपूर्व काळातली असून १९४५ साली झालेली आहे. गेली अनेक वर्ष हा उत्सव सुरू असताना हा केवळ उत्सव न राहता यातून आपण समाजासाठी काहीतरी देण लागतो या भावनेतून सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत. शालेय विद्यार्थ्यांना संगणक संच वाटप व कोरोनाच्या काळामध्ये ही धान्याचे किट वाटत आपले दायित्व पूर्ण केले .असे अनेक उपक्रम कायम सुरू राहतील असे मंडळाचे श्याम कडव यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त करताना सांगितले.

3.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे