ब्रेकिंगराजकिय

कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणामुळे राजकारण्यांचं स्वप्न भंगलं, कर्जत तालुक्यात राजकारणात महिलाराज

[wps_visitor_counter]

 

कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत जि.प व पं.स २०२५ आरक्षण जाहीर !

कर्जत ता १३ : कर्जत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे आरक्षण जाहीर झाले असुन, कर्जत पंचायत समिती गणाच्या एकूण बारा जागांपैकी सहा जागांवर महिलांचे आरक्षण तर जिल्हा परिषद गटाच्या एकूण सहा जागांपैकी ४ जागांवर महिलांचे आरक्षण जाहिर झाल्याने महिलांचे वर्चस्व राहाणार आहे.

कर्जत तालुक्यातील एकूण साहा जिल्हा परिषद गटाच्या जागेच्या आरक्षणाची तसेच रायगड जिल्ह्यातील आदी तालुक्यांची आरक्षण सोडत प्रक्रिया ही दि. १४ ऑक्टोंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाली आहे. या आरक्षण सोडती मध्ये कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या सहा जागांप्रमाणे कर्जत ०९ क्र. कळंब अनुसुचित जमाती, कर्जत १० क्र. कशेळे अनुसुचित महिला, कर्जत ११ क्र. माणगांव तर्फे वरेडी सर्वसाधारण महिला, कर्जत १२ नेरळ सर्वसाधारण महिला, कर्जत १३ क्र. कडाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, कर्जत १४ क्र. मोठे वेणगांव अनुसुचित जमाती माहिला असे आरक्षण पडले आहे. तर
कर्जत पंचायत समिती गणाच्या एकूण बारा जागांच्या आरक्षण सोडत ही प्रक्रिया ही कर्जत प्रशासकीय भवनात प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ व कर्जत तहसिलदार धनंजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे. या आरक्षण सोडती मध्ये कर्जत तालुक्यातील पंचायत समिती गणाच्या एकूण १२ जागांप्रमाणे १ पोशीर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, २ कळंब -अनुसूचित जमाती महिला राखीव, ३ पाथरज -अनुसूचित जमाती महिला राखीव, ४ कशेळे – अनुसूचित जमाती,५ माणगाव तर्फे वरेडी – सर्वसाधारण, ६ उकरूळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, ७ नेरळ – सर्वसाधारण, ८ दामत – सर्वसाधारण, ९ वाकस – सर्वसाधारण, १० कडाव – सर्वसाधारण महिला राखीव, ११ मोठे वेणगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग १२ बीड बुद्रुक – सर्वसाधारण महिला, असे आरक्षण जाहीर झाले असुन, या जाहीर आरक्षणा संदर्भात हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख ही दि. १७ ऑक्टोंबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे