नेरळ शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी हेमंत (बंडू) क्षिरसागर यांची निवड
नेरळ ता: १८ फेब्रुवारी : नेरळ (ता. कर्जत)येथे शिवजयंती उत्सवसमितीच्या अध्यक्षपदी हेमंत (बंडू) क्षिरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या उत्सवसमितीच्या बैठकीत सर्व शिवप्रेमींच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.
शिवजयंती उत्सव समिती २०२६

अध्यक्ष
श्री. हेमंत(बंडू) बबन क्षिरसागर
उपाध्यक्ष
कु.मुकुल दळवी
कु. हर्षद पार्टे
सचिव
कु. किरण मालप
उपसचिव
कु. गुरु क्षिरसागर
कु. दिनेश भवारे
खजिनदार
श्री. रमेश पवार
सह खजिनदार
कु. हरेश भाटकर
यावेळी उपस्थित नेरळकर नागरिक व शिवप्रेमी यांनी हेमंत (बंडू) क्षिरसागर यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत (बंडू) क्षिरसागर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नेरळमध्ये भव्य मिरवणूक, शिवप्रतिमेचे पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजप्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस उत्सवसमितीचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते किसन शिंदे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.उत्सव समिती निवड करण्यासाठी आणि उत्सवाचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीला मिलिंद मिसाळ,संतोष पेरणे, विशाल साळुंके, राहुल भाटकर,प्रीतम गोरी, चिराग गुप्ता, अल्पेश मनवे,मंगेश मगर,सर्वेश गायकवाड,प्रमोद कराळे,यतीन यादव, प्रमोद गुप्ता, कल्पेश गवळी, सर्वेश मिसाळ, सर्वेश गायकवाड, तन्मय दिसले,दुर्वांकुर पवार, आशिष जोशी, ओमकार लगड,प्रतीक भिसे,हरेश भाटकर,दीप देशमुख,दीर्वांकुर पवार,सर्वेश मिसाळ,रोहन मिसाळ,विघ्नेश लाड आदी उपस्थित होते.



