ब्रेकिंग

रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या सणाला धक्कादायक घटनेने खळबळ…..

[wps_visitor_counter]

 

रायगड: सुमित क्षिरसागर

रायगड दि: २१ रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाला धक्कादायक वळण आले असून, या प्रकरणातील एक आरोपी कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली आहे. ज्योतिराम पांडुरंग वरुडे (वय ४८, रा. तळाशेत, इंदापूर, ता. माणगाव) यांनी अलिबाग जवळील विद्यानगर येथे मेव्हण्याच्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. फेब्रुवारी २०२५ मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणी ज्योतिराम वरुडे, नाना कोरडे आणि महेश मांडवकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चौकशी प्रकरणात वरुडे यांच्यावर मानसिक तणाव वाढत चालल्याची देखील चर्चा सुरू होती. २० ऑक्टोबर रोजी, त्यांनी विद्यानगर येथे आपल्या मेव्हण्याच्या घरी असताना विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली व नातेवाईकांनी तातडीने अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दीपावली च्या दिवशी सोमवार दिनांक २०ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेबाबत त्यांची पत्नी अश्विनी वरुडे (वय ४७) यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस तपास सुरू आहे. ही आत्महत्या नेमकी आर्थिक अपहारप्रकरणातील दबावामुळे झाली की इतर कोणत्यातरी वैयक्तिक कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही याचे कारण येणाऱ्या आगामी काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत संशयाची सुई पुन्हा एकदा फिरू लागली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या आत्महत्येमुळे अपहार प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे