दिवा पोलिस चौकीचे सुभाष मोरे यांची पोलीस उपनिरीक्षक तर किशोर वैरागकर हवालदारपदी बढती.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १ ऑगस्ट – मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस दलातील अधिकारी सुभाष गंगाराम मोरे यांना आज परिमंडळ १ चे सहायक आयुक्त भुरसे व अतिरिक्त सहायक आयुक्त उत्तम कोळेकर यांच्या हस्ते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत बढतीचे स्टार लावण्यात आले. उपसहायक पोलीस निरीक्षक सुभाष मोरे यांना आज सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस व डायघर पोलीस दलात 15 ते 20 वर्षांपासून ते सेवा देत असून गुन्हे शाखा युनिट 1 मध्ये पुन्हा सेवा काळ देऊन दिवा पोलिस चौकी येथे कार्यरत आहेत.
तसेच 2013 ला त्यानी अहर्तेची शैक्षणिक परीक्षा देऊन पी एस आय झाले आहेत त्याचेच फलीत म्हणून त्यांना आज बढती देऊन सन्मानित करण्यात आले तर दिवा पोलीस चौकीचे पोलीस नाईक किशोर वैरागकर यांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंब आणि मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत




