महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे व माँ शारदे फाऊंडेशन आयोजित भीमाशंकर येथे महाभंडारा.
संतोष पडवळ – ठाणे
ठाणे ता ३१ जुलै : श्रावणी सोमवारच्या निमित्ताने माँ शारदे फाउंडेशन ठाणे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे भव्य महाभंडारा आयोजित करण्यात आला होता. सदर उपक्रमासाठी ५० हून अधिक सेवेकरी व पत्रकार प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. प्रसंगी जवळपास ५ हजार भाविकांना मोफत प्रसाद / भोजन व्यवस्था करण्यात आली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, मंदिर ट्रस्ट तसेच स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिस्तबद्ध पद्धती ने संपूर्ण नियोजन करण्यात आला होता.
माँ शारदा फाउन्डेशनचे अध्यक्ष राकेश कुमार झा, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ठाणे (मुंबई) चे कार्याध्यक्ष अतुल तिवारी व प्रमोद झा, पंकज झा व इतर सहकारी यांच्या समन्वयाने संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध पार पडला. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून प्रेरित होऊन, भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल,” असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचे, सहकार्य करणाऱ्या यंत्रणांचे व भीमाशंकर परिसरातील जनतेचे आयोजक व मॉ शारदे फांउडेशन चे अध्यक्ष राकेश राकेश कुमार झा ने आभार मानले.




