दिव्यातील सुरज खळे याची “महाराष्ट्र कुमार श्री” स्पर्धेत निवड.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १५ मार्च : दिवा शहरातील श्रीमंतयोगी जिम्नेशियम मधील सुरज खळे यांची महाराष्ट्र कुमार श्री स्पर्धेत निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. दिवा शहरातील गणेशपाड्यात राहणारा सुरज खळे गेली एक वर्षापासून श्रीमंतयोगी जिममध्ये मेहनत घेत असून जिमचे प्रशिक्षक ओमकार सावंत आणि रवी शेजवळ यांचे सुरजला मोठं योगदान मिळाले आहे. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मालदोली बांद्रेवाडी हे सुरज शिवराम खळे यांच छोटंस गाव असून आपली मेहनत व जिद्दीच्या बळावर महाराष्ट्र कुमार श्री स्पर्धेत सूरजची निवड झाली आहे.
व्यायामाची आवड असलेल्या सुरजला श्रीमंतयोगी जिम्नेशियमचे संचालक राहुल कानस्कर व संकेश भावे यांचे देखील वेळोवेळी योगदान मिळाले असल्याचे सुरज खळे यांनी स्पष्ट केले आहे. मागील वर्षीच्या ठाणे जिल्हा ४५ वी अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सूरज यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता. सुरज खळे यांची महाराष्ट्र कुमार श्री स्पर्धेत निवड झाल्याने दिवा शहरात सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा देण्यात येत आहे.



