आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

भालिवडी शासकीय मा व उ. मा कन्यआश्रम शाळेत बिरसा मुंडा जयंती निमित्त जनजातीय गौरव दिवस साजरा  जिल्हाधिकारी किशन जावळे,पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांची प्रमुख उपस्थिती !

[wps_visitor_counter]

 

कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत ता १९ नोव्हेंबर : कर्जत तालुक्यातील मौजे भालिवडी शासकीय माध्यमिक उच्च माध्यामिक कन्या आश्रम शाळेमध्ये दि. १५ नोव्हेंबर रोजी क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजातीय गौरव दिवस हा साजरा करण्यात आला.

दि.१५ नोव्हेंबर रोजी पूर्ण भारत भर क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी आनेक ठिकाणी संस्कृतीक कार्यक्रम, वेशभूषा, आदिवासी पारंपारीक नृत्य,भाषणे या सारखे क्रार्यक्रम सादर करण्यात आले. याच वेळी कर्जत तालुक्यातील मौजे भालिवडी येथील शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेमध्ये दि.१५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिवस हा रायगड जिल्हा अधिकारी किसन जावळे व पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांची प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवर रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे व पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांचे स्वागत हे शाळेतील विद्यार्थिंनी यांनी लेझीम नृत्याचे माध्यमातून व शाळेतील विद्यार्थिनींने औषन करून केले. यावेळी विद्यार्थिनींनी काढलेल्या बिरसा मुंडा यांच्या रांगोलीची पाहाणी करून, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राघोजी भांगरे, सरस्वती माता यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांचे स्वागत हे शाल, फुलगुच्छे देऊन शाळेचे मुख्यध्यापक मोहन पडघम यांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांना शाळेतील विद्यार्थीनी यांनी वारली पेंटिंग केलेली फ्रेम ही उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आली. यावेळी रायगड जिल्हाधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील एम पी एस सी परिक्षा उत्तीर्ण झालेला नयन वाघ याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील विविध स्पर्धामध्ये पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थिनींचा गौरव हा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कण्यात आला. या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह प्रेक्षपण भाषण हे शाळेतील विद्यार्थिनींना ऐकवण्यात आले. त्यानंतर शाळेतील मुलींनी स्वतः तयार केलेल्या वस्तू व ग्रंथालयातील पुस्तकांच्या प्रदर्शनाची पाहाणी करून आनंद व्यक्त मुलींचे कौतुक करत रायगड जिल्हाधिकारी पेण प्रकल्प अधिकारी यांनी शाळेतील सर्व कर्मचारी शिक्षक व विद्यार्थिनी यांच्या सोबत फोटोसेशनचा आनंद देखील घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे