खोपोली: सुमित शिरसागर
कर्जत ता २१ जुलै : खोपोली शहरात शिवसेना(शिंदे गट) पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा व मेळावा रविवारी सायंकाळी श्री समर्थ मंगल कार्यालय उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. भरतशेठ गोगावले साहेब म्हणाले, “तुमच्या मतदार संघाचे आमदार श्री. महेंद्र थोरवे मतदार संघासाठी सातत्याने कार्यरत आहेत, ते मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे करत आहेत. त्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे. आता आमदार श्री. महेंद्र थोरवेंची पुढची टर्म फिक्स झाली आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “कर्जत-खालापूर मतदार संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा पक्ष व सरकार कटीबद्ध आहे. सध्या पक्ष प्रवेशाचा ओघ सर्वांत जास्त आपल्या शिवसेनेकडे आहे. कार्यकर्ते, शिवसैनिक यांना जपणे हा आमचा धर्म आहे. आजच्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. श्री. कुलदीपक शेंडे आणि इतर सहकाऱ्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे आपली संघटना खोपोलीत मजबूत होईल.”

यावेळी खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. कुलदीपक शेंडे, नगरसेवक श्री. दिलीप जाधव, नगरसेवक श्री. संदीप पाटील, श्री. राजन घोसाळकर,श्री. केतन शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला.

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “सर्वाधिक प्रवेशासाठी पसंती असणारा पक्ष म्हणजे आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात, आदरणीय श्री. बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारी आपली शिवसेना आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला पक्ष एक नंबरला असेल हा विश्वास आपल्या सर्वांनाच आहे. आमदार श्री. महेंद्र थोरवे यांनी मतदार संघात प्रचंड विकसात्मक कामे केली आहेत. कामांच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर श्री. महेंद्र थोरवे हे आमदार झाले आहेत. त्यांच्या कामांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.”
याप्रसंगी आमदार श्री. महेंद्र थोरवे म्हणाले, “मेळाव्याला शिवसैनिकांची मोठी उपस्थिती पाहून मनस्वी आनंद होत आहे. हा मेळावा कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारा आहे. शिवसेनेचे या मतदार संघातील उभं राहिलेलं संघटन हे ऐतिहासिक आहे. श्री. कुलदीपक शेंडे हा प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. विरोधकांनी त्यांच्यावर चुकीची टीकाटिप्पणी करत आहेत, आदरणीय श्री. रामदास शेंडे यांचे खोपोलीसाठीचे योगदान मोठे आहे. त्यांचाच समाजसेवेचा वारसा श्री. कुलदीपक पुढे नेत आहेत. आज झालेल्या प्रवेश सोहळ्यामुळे आपले संघटन आणखी मजबूत झाले आहे. गावोगावी आपल्याला शिवसेनेचे संघटन मजबूत करायचे आहे. सर्वांनी शिवसेनेचे विचार तळागाळात पोहचवणे आवश्यक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा.”
या कार्यक्रम प्रसंगी संपर्क प्रमुख श्री. विजुभाऊ पाटील म्हणाले की, “आजचा हा मेळावा म्हणजे पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल आहे. आज प्रवेश केलेल्या सर्वांच्या मतांचा पक्षात आदर केला जाईल.”
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख श्री. संतोष भोईर यांनी सांगितले की, “खोपोलीची जनता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाची मुहूर्तमेढ नक्कीच रोवेल. निवडणुका तोंडावर आहेत, आपण सर्वांनी तयारीला लागावे. खोपोली नगरपरिषदेवर भगवा नक्की फडकेल. पक्ष देईल त्या आदेशाप्रमाणे आपल्याला काम करायचे आहे.”
श्री. कुलदीपक शेंडे म्हणाले, “आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब व आपल्या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. महेंद्र थोरवे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी प्रवेश केला आहे. मतदार संघासाठी आमदार साहेबांनी 3 हजार कोटींचा निधी आणला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही सर्वजण मिळून खोपोलीवर भगवा नक्की फडकवू. आमदार श्री. थोरवे साहेब, खासदार श्री. बारणे साहेब हे सर्व कार्यकर्त्यांना संधी देऊन सांभाळून घेतात, ते कार्यकर्त्यांना ताकद देतात.”
युवा सेना जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद थोरवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “विधानसभेला खोपोली व परिसरातील मतदारांनी आमदार साहेबांना १७ हजारांचे मताधिक्य देण्याचे काम केले, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायला हव्यात. येणाऱ्या काळात मतदार संघात युवा सेना मजबूत करण्याचे काम आपण करणार आहोत. ‘गाव तिथे युवा शाखा, शाखा तिथे युवा सैनिक’ अशी संकल्पना आपण राबविणार असल्याचे ते म्हणाले.”
मेळाव्याच्या सांगता प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यामध्ये श्री. जयेश तावडे, श्री. मनोज मिसाळ, श्री. दिलीप मणेर, श्री. भालचंद्र भोसले, श्री. रोहित विचारे, श्री. प्रमोद शिर्के, डॉ. श्री. सुनील पाटील, श्री. जैगुणिया शेख, श्री. तानाजी मोगारे आदींचा समावेश होता. मेळाव्याला विविध भागातील शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, बुथप्रमुख आणि निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यास व प्रक्ष प्रवेश सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून
राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले , मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे , जिल्हाप्रमुख श्री. संतोष भोईर, संपर्क प्रमुख श्री. विजुभाऊ पाटील, श्री. भाई शिंदे, श्री. सुनील पाटील, युवा जिल्हा प्रमुख श्री. प्रसाद थोरवे, श्री. मनोहर थोरवे, माजी नगरसेवक अॅड. श्री. संकेत भासे, श्री. भाई गायकर, श्री. उल्हास भुर्के, श्री. शशीभाऊ देशमुख, श्री. विनोद साबळे, श्री. पंकज पाटील, श्री. जनार्धन जाधव, सौ. नीलमताई चोरघे, सौ. सुप्रियाताई साळूंखे, श्री. शिवराम बदे, श्री. संदेश पाटील, श्री. कृष्णा मोढवे, श्री. संदीप पाटील, सौ. प्रियाताई जाधव, श्री. संतोष मालकर, श्री. विश्वनाथ पाटील, श्री. शेखर दामले, श्री. संकेत पाटील, श्री. बुरखे आप्पा, श्री. राजू गायकवाड, श्री. तात्या रिठे, श्री. रॉबिन, श्री. हरीश काळे, श्री. संतोष मालकर, श्री. संतोष मापदी,श्री विश्वनाथ पाटील, श्री मोहन औसरमल, माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल ,श्री. संतोष महामुणकर, श्री. नाना मोरे, श्री. दिनेश थोरवे, सौ. रेश्मा मोढवे, सौ. रेश्मा आंग्रे, सौ. माधवी रिठे,श्री अमोल बांदल पाटील व असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते



