लावणीसम्राज्ञी व लावण्यवती विजया पालव (कदम) यांना दादासाहेब फाळके नंतर तेजस्विनी पुरस्कार प्रदान.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १३ मार्च : लावण्यवती विजया पालव (कदम) यांना दादासाहेब फाळके पुरस्कारा नंतर महिलादिनी तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या लावणी क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन 25 जानेवारी 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे प्रसिद्ध वृत्तनिवेदन विलास बढे यांच्याहस्ते मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. लहानपणापासून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वर्षा धांदळे, सुनील गोडबोले, अरुण नलावडे, विजय पाटकर अश्या कलाकारांच्या आदर्श घेतलेल्या लावण्यवती विजया पालव (कदम) यांनाही फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रसंगी विजया यांनी लावणी सादर केली आणि सर्व दिग्गज कलाकारांनी तत्यांची कौतुकाने पाठ थोपटली. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर विश्वास दाखवून चित्रपट युनियन मधे General Secretary या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लावणी मध्ये हा पुरस्कार मिळणारी व व दादासाहेब फाळके युनियन च्या पदावर येणारी मी आत्ताच्या पिढीतील मी पहिलीच कलाकार असून याचा मलाही खुप आनंद झाला असल्याचे विजया यांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श शैक्षणिक समूहाकडून पनवेल येथे “मातृत्व ते नेतृत्व” स्त्रीच्या प्रवासाचा सन्मान या उपक्रमांतर्गत तेजस्विनी सन्मान 2026 हा पुरस्कार व मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. चला हवा येऊ द्या फेम अभिनेते डॉ. निलेश साबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी आदर्श शैक्षणिक समूहाचे धनराज विसपुते, सौ. संगीता विसपुते, प्राचार्य कुसुम मधाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



