ब्रेकिंगराजकिय

भाजपला धक्का, राष्ट्रवादीला बळ! माजी नगराध्यक्ष राजेश लाड राष्ट्रवादीत दाखल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; कर्जतच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

[wps_visitor_counter]

 

कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत : २ ऑगस्ट २०२६: कर्जतच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून भाजपला धक्का देत माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

राजेश लाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे कर्जत शहरातील आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रवेशाची स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लाड यांच्या राजकीय अनुभवाचा आणि शहरातील संपर्काचा राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, बंधु पाटील, पक्षाचे प्रवक्ते भरत भगत, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, रायगड जिल्हा परिषद गटनेते संतोष बैलमारे, जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुवर्णा प्रदीप ठाकरे, पंचायत समिती सदस्य भगवान चंचे,कर्जत नगराध्यक्ष सौ. पुष्पा दगडे, नगरसेवक सुनील पाटील, तालुकाध्यक्ष रंजना धुळे, सागर शेळके, गणेश खराटे आदी मान्यवर व राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेश लाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे कर्जत शहरातील पक्षीय ताकदीत वाढ होण्यासोबतच आगामी स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. विशेषतः आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या प्रवेशामुळे भाजपला कर्जतमध्ये बसलेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, पुढील काळात आणखी काही राजकीय हालचाली होणार का? याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे