गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट गुरूंचे आशीर्वाद लाभणे हेच मोठे भाग्य; जनसेवेसाठी नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा: महेंद्र थोरवे (आमदार,कर्जत विधानसभा)

कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत दि.२९ जुलै २०२६ ; गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधत कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार थोरवे यांनी शिंदे यांचे आशीर्वाद घेत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या नेतृत्वाची भेट आणि दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याची भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली. जनसेवेसाठी प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे आपल्यासाठी नेहमीच ऊर्जादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार थोरवे म्हणाले, “गुरूंचे आशीर्वाद लाभतात त्यासारखे दुसरे भाग्य नाही. आम्हाला लढण्याची प्रेरणा देत जनसेवेसाठी मनगटात बळ देणाऱ्या आमच्या नेतृत्वाची, अर्थात आमच्या गुरूंची भेट व दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले.”
तसेच, “साहेब, तुमची प्रत्येक भेट मनाला नव्याने लढण्याची उर्मी देणारी ठरते,” अशी भावना व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.



