नेरळच्या टेकडीवर हरितक्रांतीची मुहूर्तमेढ ; नेरळ व्यापारी वेल्फेअर असोसिएशन व वनविभागाचा संयुक्त पुढाकार

नेरळ : सुमित क्षिरसागर

नेरळ ता.१ ऑगस्ट २०२६:
नेरळ परिसरातील हेटकरआळीच्या बाजूला असलेल्या टेकडीवर हरितक्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने व्यापारी वेल्फेअर असोसिएशन नेरळ आणि वनविभाग नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.१
दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत टेकडी परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. परिसराचे सौंदर्य वाढविण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात हिरवाई वाढविण्यासाठी या उपक्रमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला व्यापारी वेल्फेअर असोसिएशन नेरळचे अध्यक्ष विशाल साळुंके, उपाध्यक्ष अरविंद कटारिया यांच्यासह कमलेश ठक्कर, मेहुल कटारिया, नीलेश शाह, रवी जैन, नीलेश परदेशी, राहुल शाह, अमित जैन, आशिष जैन, महेश कटारिया, अंकुर शाह आणि परेश कांतिलाल उपस्थित होते.
तसेच वनविभागाच्या वतीने वनविभाग अधिकारी अनिल पाटील आणि वैशाली जाधव यांची उपस्थिती होती.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. व्यापारी वर्गाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.



